दिल्लीच्या नेहरू स्मारकात फेरबदल करू नका

माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचे मोदींना पत्र
नवी दिल्ली – मोदी सरकारने दिल्लीतील तीन मुर्ती भवनात उभारण्यात आलेल्या नेहरूंच्या स्मारकात फेरबदल करून तेथे नेहरूंबरोबरच अन्यही पंतप्रधानांचे स्मारक बनवण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्याला माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी आक्षेप घेतला आहे.

नेहरूंचा वारसा पुसण्याचा प्रयत्न केला जाऊ नये अशी अपेक्षा त्यांनी या पत्रात व्यक्‍त केली आहे. नेहरू हे केवळ कॉंग्रेसचे नव्हते तर ते साऱ्या देशाचे होते. त्यामुळे त्यांच्या नावाने सुरू असलेल्या या स्मारकात कोणतेही फेरबदल करू नयेत आणि नेहरूंना दुय्यम लेॅखण्याचा प्रयत्न करू नये असे मनमोहनसिंग यांनी मोदींना सुचित केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तीन मुर्ती भवनात नेहरूंच्या स्मारकाबरोबरच त्यांच्या विचारांनी चालणाऱ्या संस्थांचीही कार्यालये आहेत. नेहरू स्मारक निधीचेही तेथे कार्यालय असून तेथे नेहरू प्लॅनेटोरियमही उभारण्यात आले आहे. नेहरुंच्या या स्मारकात फेरबदल करून तेथे देशाच्या अन्य पंतप्रधानांचीही आठवण ठेवण्यासाठीचा एक प्रकल्प 270 कोटी रूपये खर्चुन उभारला जात आहे.

या संबंधात मनमोहनसिंग यांनी मोदींना पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की या आधी देशात वाजपेयी यांचेही सरकार होते त्यावेळी त्यांनीही तीन मुर्ती भवनातील स्मारकात हस्तक्षेप करण्याचा किंवा तेथे ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला नाही. पण विद्यमान सरकार मात्र तेथे हस्तक्षेप करीत आहे ही दुर्देवी बाब आहे.

नेहरूंच्या निधनानंतर वाजपेयी यांनी संसदेत त्यांना आदरांजली वाहताना केलेल्या भाषणाचे काही अंशही मनमोहनसिंग यांनी या पत्रात उधृत केले आहेत. वाजपेयी यांच्या भावनांची कदर केली जावी आणि नेहरूंचे तीन मुर्ती भवन येथील स्मारकाचे जसेच्या तसे जतन केले जावे अशी मागणी मनमोहनिंसंग यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)