दिदीच्या नावाने महादेववाडीतील गल्लीत दादांची दहशत

दिदी जेरबंद; दहशत करणारे दादा फरार

पुणे,दि.23- खडकीतील महादेववाडी येथे तथाकथीत दिदीच्या नावाने काही गल्लीतील दादा लोकांनी दहशत पसवरली. वस्तीत दिदीच्या परवानगी शिवाय गाडी आणायची नाही असा दम भरत एकास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच तलवारी आणी कोयते हवेत फिरवत आमचे ऐकत नसाल तर एकेकास खल्लास करु अशी दमबाजी रहिवाशांना करण्यात आली. याप्रकरणी खडकी पोलीसांनी संबंधीत दिदीला अटक करुन तीच्या दोघा साथीदारांवर गुन्हे दाखल केले आहेत.

याप्रकरणी अमित काची (36,रा.खडकी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसा संबंधीत दीदीने तीच्या भावाच्या टोळीची सूत्रे हातात घेतली होती. तीच्या टोळीतील दोन साथीदारांनी फिर्यादी कार मधून जात असताना त्याची गाडी अडवली. त्याला हातातील कोयता दाखवत, तु आम्हाला ओळखत नाहीस का? आमच्या सोबत दीदी आहे, ती आमच्या गॅंगची लीडर आहे. दिदीच्या परवानगिशीवाय वस्तीत गाडी आणायची नाही. महादेववाडी फक्त दिदीच्या मालकीची आहे, परत गाडी आणली तर तुला खल्लास करुन टाकेल अशी धमकी दिली. यानंतर काही वेळाने ते फिर्यादीच्या घरी आले.

घरात फिर्यादीचे आई-वडिल होते. त्यांच्यासमोर कोयता व तलवारी हवेत फिरवत तुमचा मुलगा कोठे आहे ? आज त्याला जिवंत सोडणार नाही असा दम भरत घराच्या लोखंडी दरवाजावर कोयता व तलवारीने वार केले. यानंतर आजु बाजच्या लोकांना आमचे ऐकत नसाल तर एकेकाला खल्लास करु अशी धमकी दिली. यामुळे वस्तीतील घाबरलेल्या नागरिकांनी आपापल्या घराचे दरवाजे व खिडक्‍या बंद केल्या. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिंदे करत आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनूसार संबंधीत दिदीचा भाऊ सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खूनाच्या प्रयत्नासह 21 गुन्हे दाखल आहेत. तो सध्या एका गुन्हयात कारागृहात शिक्षा भोगत आहे. तो कारागृहात असल्याने त्याच्या टोळीची सूत्रे दिदीने घेतली होती. ती दहशत माजवत असल्याने तीला अटक करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.