दिड कोटी खंडणी व अपहरण प्रकरणी मुख्य सुत्रधारासह तीघे जेरबंद

दिड कोटी खंडणी व अपहरण प्रकरणी मुख्य सुत्रधारासह तीघे जेरबंद
पैसै घेणारा व व्यापाऱ्याचे अपहरण करणारेही अटक ; वानवडी पोलिसांची कारवाई

पुणे,दि.15- मार्केटयार्डमधील व्यापाऱ्याचे अपहरण करून दीड कोटी रुपयांची खंडणी उकळणाऱ्या तीघांना परिमंडळ पाच आणी गुन्हे शाखेने संयुक्त कारवाईत शुक्रवारी जेरबंद केले होते. मात्र मुख्य सुत्रधार अजय साबळे आणी व्यापाऱ्याचे प्रत्यक्षात अपहरण करणारे दोघे फरार होते. या सर्वांना वानवडी पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले आहे.
मार्केटयार्डमधील व्यापारी कांतीलाल गणात्रा(65,रा.सिटी पार्क मार्केटयार्ड) यांचे अपहरण करण्यात आले होते त्यांना चारचाकी गाडीत घालून ठिकठिकाणी फिरवण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवरु त्यांचा मुलगा महेश गणात्रा याला मोबाइलवर कॉल करुन दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली. ती दिली नाही, तर वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. वडिलांच्या जीवाला धोका नको म्हणून आम्ही दिड कोटी देण्यास तयार असल्याचे सांगितले. मात्र गणात्रा यांच्या जीवाचा धोका लक्षात घेऊन रक्कम घेण्यास दुचाकीवरुन आलेल्या आरोपींना पकडण्यात आले नाही. दुचाकीवरील आरोपींनी थोड्या अंतरावर जाऊन रक्कम फॉर्च्युनर वाहनातून आलेल्या साथीदारांकडे सोपवली. दरम्यान पैसे मिळाल्याची खातरजमा झाल्यावर आरोपींच्या साथीदारांनी गणात्रा यांना शिदेवाडी येथे सोडले. गणात्रा सुखरुप सुटल्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाली करत सुजित किरण गुजर(24,रा.उरळी देवाची) व ओंकार श्रीनाथ वाल्हेकर(20,रा.उरळी देवाची ) या दोघांना अटक केली. दरम्यान त्यांच्या चौकशीत मुख्य आरोपी अजय बाळासाहेब साबळे व त्याच्या साथीदार अमित जगताप(रा.उरळी देवाची) यांनी रोख रक्कम फॉर्च्युनर गाडीतून नेल्याचे सांगितले. त्यानूसार युनिट पाचच्या पथकाने उरळीकांचन आणी वडकी नाला ही गावे पिंजुन काढत गाडी व गाडीत असलेली 1 कोटी 47 लाख 50 हजाराची रोकड तसेच एक दुचाकी असा 1 कोटी 75 लाख 20 हजाराचा ऐवज हस्तगत केला मात्र मुख्य सुत्रधार साबळे व अपहरण करणारे दोघे गुन्हेगार अद्याप आढळून आले नव्हते. त्यांच्या मागावर गुन्हे शाखा आणी परिमंडळ पाचच्या अंतर्गत पोलीस ठाण्याची पथके होती. यातील वानवडी पोलीस ठाण्याच्या पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींना जेरबंद केले आहे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)