दारू पिऊन आई-वडिलांना शिव्या देत असल्याने मोठ्या भावाकडून लहान भावाचा खून

मंचर – मांदळेवाडी (ता. आंबेगाव) येथे आई-वडिलांना दारू पिऊन मारहाण करण्याच्या कारणावरुन मोठ्या भावाने सख्ख्या लहान भावाचा खून केल्याची घटना सोमवारी (दि. 3) सकाळी घडली. घटनेतनंर भाऊ फरार झाला आहे. पांडुरंग बबन जाधव (वय 36) असे खून झालेल्या लहान भावाचे नाव आहे. तर दादाभाऊ जाधव हा फरार आहे.

याप्रकरणी वडील बबन आप्पा जाधव यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेली माहिते अशी की, आंबेगाव आणि शिरूर तालुक्‍याच्या सरहद्दीवर मांदळवाडी गाव आहे. तेथे ठाकर समाजातील बबन जाधव आणि त्यांची पत्नी राहतात. गावातील नामदेव थिटे यांनी तुमचा मुलगा पांडुरंग हा शेटे मळ्यातील शेताजवळ दारू पिऊन पडलेला असल्याचे जाधव यांना सांगितले. त्यानुसार शेटेमळ्यात पांडुरंग यांना शोधण्यासाठी बबन जाधव यांच्या घरातील सर्वजण गेले असता. तो शेतामध्ये पाठीवर पडलेला दिसून आला.

यावेळी पांडुरंग यांनी सांगितले की, मी तुम्हाला दारू पिऊन शिवीगाळ, मारहाण करतो. त्यामुळे दादाभाऊ याने मला काठीने मारहाण केली आहे. जखमी अवस्थेतील पांडुरंग यास मोटारसायकलवर बसवून घरी आणले. मुका मार लागला असावा आणि रात्रीच्या वेळी दवाखान्यात नेण्यासाठी वाहन नसल्यामुळे त्याला अंगणात झोपवले. सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पांडुरंग याला दवाखान्यात नेण्यासाठी उठविण्याचा प्रयत्न केला असता तो उठला नाही, म्हणून गावचे पोलीस पाटील काळुराम पालेकर यांना बोलावून झालेल्या घटनेची माहिती जाधव यांनी दिली. जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मंचर उपजिल्हा रुग्णालयात पांडुरंग यांना नेले असता डॉक्‍टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी भेट दिली आहे. पुढील तपास मंचर पोलीस करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.