दारूविक्री करणाऱ्या महिलांनी केली मारहाण

देऊळगावात दोन महिला आणि एकावर गुन्हा

देऊळगावराजे – पोलीस कारवाई करीत नाहीत, यामुळे गावातील महिलांनी एकत्र येत गावातील दारू अड्डे उद्धवस्त केले. मात्र, यात दारू विक्री करणाऱ्या महिलांनी गावातील महिलांना मारहाण केल्याने दोन महिला आणि एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देऊळगांवराजे (ता. दौंड) येथे दि. 15 मे रोजी महाराष्ट्र राज्य दारूबंदी कृती समितीच्या वतीने महिला अध्यक्ष सुभद्रा शिवाजी मुंडलीक आणि इतर 15 महिलांनी भैरवनाथ मंदिरात संपूर्ण दारूबंदीसाठी उपोषण सुरू केले होते. त्यावेळी दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ऋषीकेश अधिकारी यांनी गावातील अवैध दारू बंद करून कारवाई केली जाईल, असे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर या महिलांनी उपोषण सोडले होते. पण, गावात गेल्या वीस दिवसांपासून दारू विक्री चालूच असल्याचे या महिलांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतरही दारू विक्री चालूच राहिल्याने गुरुवारी (दि. 6) रात्री महिलांनी एकत्र येत दारू विक्रीचे अड्डे उद्‌ध्वस्त केले. परंतु, त्यावेळी या महिलांना दारू विक्री करणाऱ्या महिलांनी मारहाण आणि शिविगाळ केली, यामुळे नवनाथ सूर्यवंशी, संगीता माने, रंजना पोळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.