दारुची वाहतूक करणारा वाहनासह ताब्यात

  • 3 लाख 7 हजाराचा मुद्देमाल जप्त : शिक्रापूर पोलिसांची तळेगाव ढमढेरे येथे कारवाई

शिक्रापूर – येथून दारूची वाहतूक करणाऱ्या दहीवडी येथील एका हॉटेल चालकास दारूच्या बाटल्या आणि दारू वाहतूक करणाऱ्या वाहनासह ताब्यात घेतले आहेत. शिक्रापूर पोलिसांनी वाहन आणि दारू असा सुमारे 3 लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक हेमंत पांडुरंग इनामे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विलास दगडू दौंडकर (रा. दहिवडी, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शिक्रापूर (ता. शिरूर) येथून तळेगाव बाजूकडे एक क्वॉलिस वाहन दारूच्या बाटल्या घेऊन जात असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक प्रशांत माने यांना मिळाली होती. त्यांनतर प्रशांत माने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र शिंदे, पोलीस नाईक हेमंत इनामे यांनी शिक्रापूर तळेगाव रोड लगत असलेल्या शिक्षक भवन समोर जाऊन थांबून आलेल्या (एमएच 04 बीएस 9517) या क्वॉलिस वाहनाची चौकशी केली. यावेळी त्यांना त्यामध्ये दारूच्या वेगवेगळ्या कंपनीच्या 56 बाटल्या आढळून आल्या. त्यांनतर या पोलिसांनी दारू वाहतूक करणारे वाहन, दारूच्या बाटल्या आणि वाहनचालक विलास दगडू दौंडकर (रा. दहिवडी, ता. शिरूर, जि. पुणे) यांना ताब्यात घेतले.
तर शिक्रापूर पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये दारू आणि वाहतूक करणारे वाहन असा सुमारे 3 लाख 7 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत माने हे करत आहे.

  • अन्य दारू विक्रेते मोकाटच…
    तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) हद्दीमध्ये अनेक ठिकाणी दारूविक्री होत असून काही ठिकाणी तळेगाव ढमढेरे पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर खुलेआम दारू विक्री होत आहे. काही दारू विक्रेते दर्शनी भागात फ्रीजमध्ये दारू ठेऊन विक्री करत आहेत. परंतु काही पोलिसांच्या वरदहस्तामुळे अशा दारू विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे दारू विक्रेते मोकाटच राहत आहेत. त्यामुळे दारू विक्रेत्यांना पोलिसांची साथ मिळत असल्याचे दबक्‍या आवाजात बोलले जात आहे.
  • गुन्हा दाखल करण्यास विलंब का?
    शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पोलिसांनी दारूची वाहतूक करणारे वाहन, दारूच्या बाटल्या तसेच वाहनचालक यांना मंगळवारी (दि.29) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतल्याचा प्रकार घडला. परंतु सर्व मुद्देमाल आणि व्यक्ती पोलीस स्टेशन येथे आणून देखील सकाळी घडलेल्या प्रकाराबाबत स्वतः पोलीस कर्मचारी फिर्यादी असताना देखील दुपारी साडेतीननंतर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यास विलंब का? आणि स्वतः पोलीस फिर्यादी असताना इतका वेळ लागत असतेल तर, सर्वसामान्य नागरिकांना किती वेळ ताटकळत बसावे लागत असेल? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)