दारुंब्रेत शिवस्मारकाचे लोकार्पण

सोमाटणे – दारुंब्रे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहकार्यातून साकारलेल्या अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे अनावरण व लोकार्पण खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी संत तुकाराम साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नाना नवले, खासदार श्रीरंग बारणे कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, नगरसेवक संतोष भेगडे, उद्योजक संजय बोराडे, दत्तात्रय माळी, लक्ष्मण शितोळे, जालिंदर वाघोले, शंकर वाघोले, गणेश वाघोले, सुरेश वाघोले, हिरामण सोरटे, संतोष सोरटे, ईश्वर वाघोले, मालोजी वाघोले, पप्पू वाघोले आदी उपस्थित होते.

खासदार संभाजीराजे म्हणाले की, ग्रामीण भागात पहिल्यांदाच अशा प्रकारची अश्वारूढ व भव्य अशी शिवस्मारकाची स्थापना दारुंब्रेत केली ही अभिमानाची बाब असून शिवाजी महाराजांचे विचार देखील अगदी असेच तळागाळापर्यंत रुजावा. नुसते शिवपुतळे उभारून थांबू नका तर राजांचे विचार देखील आचरणात आणावेत, असे आवाहन त्यांनी केले.

शिवव्याख्याते सौरभ करडे यांचे व्याख्यान झाले. नाना नवले, खासदार बारणे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन सरपंच सोमनाथ वाघोले, उपसरपंच किरण वाघोले, ग्रामपंचायत सदस्य विजय वाघोले, राजेश वाघोले, तानाजी वाघोले, कैलास वाघोले, गणेश वाघोले, तुषार वाघोले, उज्ज्वला आगळे आदींनी केले. सूत्रसंचालन सुर्यकांत वाघोले व गुलाब वाघोले यांनी केले. तर आभार सोमनाथ वाघोले यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.