दामदुपटीच्या आमिषाने फसवणूक

पिंपरी – एसबीआय लाईफ इन्श्‍युरन्स पॉलिसीचे पैसे फंडामध्ये गुंतवणूक करून ही रक्कम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून एकाची 30 लाखांची फसवणूक केली.

ही घटना जुलै 2011 ते मार्च 2018 या कालावधीत ऑनलाईन ट्रान्झॅक्‍शनमधून घडली. मनोज पांडे (वय-53, रा. शिंदेनगर, बावधन खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी एका महिलेसह 21 एजंटांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज यांनी आपल्या नातेवाईकांच्या नावे एसबीआय लाईफ इन्श्‍युरन्स पॉलिसी काढली होती. त्याचे त्यांना 30 लाख रूपये मिळाले होते. हे पैसे फंडामध्ये गुंतवणूक करून दुप्पट, तिप्पट करून देण्याचे आमिष मनोज याला या विमा एजंटांनी दाखविले. त्यानुसार मनोज यांनी पैसे गुंतवले. मात्र त्यांची फसवणूक झाली. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)