दादा तुम्ही कर्जत – जामखेड लढवा … !

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सूर
जामखेड – कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघतून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणूक लढवावी असा एकमुखी ठराव जामखेड येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने घेण्यात आला.
जामखेड येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ओबीसी सेलच्या विभागाचे प्रदेश अध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी वरील ठराव घेण्यात आला. यावेळी ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन औटी, जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, माजी जि.प. सदस्य शहाजी राळेभात, मधुकर राळेभात , युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे, संभाजी राळेभात नगरसेवक अमित जाधव, नरेंद्र जाधव, उमर कुरेशी, अमोल गिरमे, संजय बेलेकर, भगवान गिते, नितीन हुलगुंडे, समिर पठाण, काकासाहेब कोल्हे भिमराव पाटील यासह तालुक्‍यातील पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाळबुधे म्हणाले की ओबीसींना केंद्र व राज्य सरकारने अनेक प्रलोभने दाखवून सत्ता मिळवली. आता अनेक योजनांमधील सवलती कमी केल्या आहेत. विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती व शिक्षणातील अनेक सवलती कमी केल्या आहेत. जागतिक बाजारपेठेत या सरकारची पत घसरली आहे. देशाची व राज्याची परिस्थिती वाईट झाली आहे. राज्य आर्थिक दिवाळखोरीत निघाले आहे, आता या सरकार विरोधात जनतेमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
यावेळी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांनी कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघतून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणूक लढवावी असा ठराव मांडला. त्यास सर्वांनी हात वर करून एकमुखी पाठिंबा दिला. यावेळी येथील भाजपाचे कट्टर समर्थक डॉ. कैलास हजारे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्वसंमतीने हजारे यांची ओबीसी सेलच्या प्रदेश प्रवक्तेपदी निवड करण्यात आली. माजी पंचायत समिती सदस्य बबनराव देवकाते यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)