‘ही’ दाक्षिणात्य अभिनेत्री करणार हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण 

दक्षिण चित्रपटसृष्टी मध्ये अव्वलस्थानी असलेली अभिनेत्री वेदिका कुमार आता हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये इमरान बरोबर “The Body” या चित्रपटामध्ये झळकणार अशी माहिती तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वर दिली. २०१३ मध्ये आलेल्या परदेशी चित्रपटामुळे वेदिकाची वाहवाह झाली आणि त्यांना अभिनय बद्दल अनेक सन्मानही मिळाले.

“The Body” चित्रपटासाठी बरेच ऑडिशन्स घेतल्यावर वेदिकाची निवड करण्यात आली आहे. वेदिका या चित्रपटात काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे. इम्रान बरोबर काम करण्याची संधी मिळाल्याने ती फार आनंदी आहे. तिने दिग्दर्शक जितू जोसेफ आणि निर्माता सुनीर खेटरपाल यांचे आभार मानले. वेदिका सध्या आतुरतेने चित्रपटाच्या चित्रीकरणाची वाट पाहत आहे. आता ‘The body’ चित्रपट कितपत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

https://twitter.com/taran_adarsh/status/1001673597243613188

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)