दहिवडीत मराठा बांधवांचा एल्गार

तहसील कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन

बिजवडी, दि. 30 (वार्ताहर) – मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी माण तालुक्‍यातही मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी एल्गार करत सर्व मराठा बांधव रस्त्यावर उतरले आहे. पाच हजांराहून अधिक आंदोलकांनी दहिवडीत मोर्चा काढत तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाला केले. मोर्चामध्ये महिलांचाही सहभाग लक्षणीय होता.
दहिवडीत माण तालुका मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून मोर्चास प्रारंभ झाला. यानंतर एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, जयभवानी जयशिवाजी, मराठा खडा तो सरकारसे बडा अशा घोषणा देत दहिवडी शहरातून रॅली निघाली. यावेळी दहिवडी शहर भगवामय झाल्याचे दिसून येत होते. तहसिल कार्यालयासमोर मोर्चा गेल्यानंतर आरक्षणाच्या मागणीसाठी काकासाहेब शिंदे, जगन्नाथ सोनवणे, रोहण तोडकर या सहकाऱ्यांनी जीव गमवाला असून त्यांना श्रध्दांजली वाहत समाजाने ठिय्या आंदोलन सुरू केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी आरक्षणासाठी शासन वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत असून समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहिला जात आहे. आरक्षणासाठी शासनाला 9 ऑगस्टपर्यंत समन्वय समितीच्या वतीने अंतिम तारीख देण्यात आली आहे. तोपर्यंत शासनाने आरक्षण दिले तर ठिक, अन्यथा शासनाला सळो की पळो करून सोडण्यचा इशारा देण्यात आला. साताऱ्यात मराठा समाजाच्या आंदोलनादरम्यान झालेल्या प्रकारानंतर खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनाच्यावतीने पोलीस उपविभागीय अधिकारी यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रविण पाटील यांच्यासह सहाय्यक पोलीस निरिक्षक, पोलीस कर्मचारी, होमगार्ड, कर्मचाऱ्यांची एस.आर.फी.एफ.ची एक तुकडी असा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी ठेवण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)