दहा पथके असूनही पंचनाम्याचे काम सुरूच

पुणे : कालवा फुटल्याच्या दुर्घटनेनंतर नागरिकांना तातडीची मदत मिळावी म्हणून महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे दुर्घटनेच्या दिवशी दुपारनंतर सुरू केले. त्यासाठी स्वतंत्र दहा पथकेही नेमण्यात आली असली तरी, घटनेच्या दुसऱ्या दिवशीही अवघ्या 245 कुटुंबांचेच पंचनामे झाले आहेत. त्यामुळे उर्वरीत नागरिकांमध्ये नाराजी आहे. त्याचा फटका या भागात पाहणीसाठी गेलेल्या महापालिका अधिकाऱ्यांना बसत असून पंचनामे करताना जाणून बुजून डावलेले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कालवा फुटल्याने स.नं 132, 133, 130 व 124 मधील आंबील ओढ्याच्या काठावर असलेल्या 1500 झोपड्यांपैकी 600 झोपड्या पाण्याच्या प्रवाहाने प्रभावीत झाल्या असून 60 झोपड्या वाहून गेल्या आहेत. तसेच, 50 हून अधिक घरांची पडझड झाली आहे. तसेच, दांडेकर पूल परिसरात कासम प्लॉटमधील 60 घरेही पाण्याने बाधीत झाली आहेत. या दुर्घटनेनंतर नागरिकांना तातडीने मदत मिळावी या उद्देशाने महसूल विभागाकडून गुरुवारी सायंकाळी 5 वाजल्यापासूनच पंचनामे करण्याचे काम हाती घेण्यात आले, त्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची मदतही घेण्यात आली असून 10 पथके नेमण्यात आली आहेत. या पथकांनी पहिल्या दिवशी रात्रीपर्यंत काम केल्यानंतर शुक्रवारी सकाळपासून पुन्हा पंचनामे सुरू केले असले तरी हा आकडा 250 च्यावर गेलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ लागला असून काही ठराविक भागांचे पंचनामे केले जात असून अजूनही आमच्याकडे कोणीच का येत नाही असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)