दहावी-बारावीच्या परीक्षेला खासगीरित्या बसणाऱ्या विद्यार्थ्यांचा अर्ज स्विकारण्याला बोर्डाकडून मुदतवाढ

सातारा  – फेब्रुवारी-मार्च 2019 मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या प्रमाणपत्र परीक्षेसाठी खासगीरित्या (फॉर्म 17) प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्यांसाठी अर्ज स्विकारण्याला राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. 11 सप्टेंबर पर्यंत विद्यार्थ्यांना संबंधित शाळा-महाविद्यालयात अर्ज दाखल करता येणार आहेत.

26 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरणे आवश्‍यक आहे. त्यानंतर 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांनी भरलेले मूळ अर्ज, विहित शुल्क आणि मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केलेल्या संपर्क केंद्र शाळेत अथवा महाविद्यालयात जमा करणे आवश्‍यक आहे.
संपर्क केंद्र शाळा-महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, विहित शुल्क, मूळ कागदपत्रे आणि यादी विभागीय मंडळाकडे जमा करणे आवश्‍यक आहे.
नाव नोंदणीअर्ज ऑनलाइन पद्धतीनेच भरायचे आहे, कोणत्याही परिस्थितीत ऑफलाइन अर्ज स्विकारला जाणार नसल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दहावीच्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यासाठी http://form17.mh-ssc.ac.in या संकेतस्थळाचा तर बारावीच्या विद्यार्थ्यांनी http://form17.mh-hsc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करावा असेही मंडळातर्फे कळवण्यात आले आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक हजार रुपये नोंदणी शुल्क आणि 100 रुपये प्रक्रिया शुल्क असे अकराशे रुपये आणि बारावीसाठी पाचशे रुपये नोंदणी शुल्क आणि शंभर रुपये प्रक्रिया शुल्क असे सहाशे रुपये भरावे लागणार आहेत. अन्य तपशील मंडळाच्या संकेतस्थळावर देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)