दहाचाकी ट्रक चोरणाऱ्या दोघांना अटक

राजगुरूनगर- धामणटेक (खेड सिटी, ता. खेड) जवळील पेट्रोल पंपावर उभा केलेला दहाचाकी ट्रक पळवून नेत असताना खेड व पाथर्डी (जि अहमदनगर) पोलिसांनी नाका बंदी करून पकडला. याप्रकरणी दोन तरुणांना अटक करून खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

शुभम रमेश दाभाडे (वय 19), संतोष अशोक कांबळे (वय 20 दोघे रा. वाळुंज, ता. गंगापूर, जिल्हा औरंगाबाद) असे अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. तर ट्रक चालक चेतन जगन्नाथ ताजणपुरे रा. चेरडी बुद्रुक जिल्हा नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत खेड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, धामणटेक येथील एस आर पेट्रोल पंपावर ताजणपुरे यांनी दहा चाकी ट्रक (एमएच 15 सीके 7389) पार्क केला होता. रविवारी (दि. 14) सायंकाळी 7 ते सोमवारी (दि. 15) रात्री साडेबाराच्या सुमारास हा ट्रक यांनी बनावट चावीच्या साहाय्याने चोरून नेला. हे चाकाच्या लक्षात येताच त्याने ट्रक मालकाला मोबाईल वरून घटनेची माहिती दिली. या ट्रकमध्ये जीपीएस सिस्टीम बसवली असल्याने ट्रक मालक यांनी पाथर्डी( जिल्हा अहमदनगर) पोलीस ठाण्यात दूरध्वनीवर माहिती दिली. खेड पोलीस व पाथर्डी पोलिसांनी
सूत्रे हलवत पाथर्डी येथे नाकाबंदी केली.

या नाकाबंदीमध्ये ट्रक चोरून घेऊन जात असताना आरोपींना पाथर्डी पोलिसांनी अटक केली. खेड उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक अरविद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवाजी बनकर विकास पाटील, संजय नाडेकर, संतोष मोरे यांनी पाथर्डी येथे जाऊन आरोपीसह लाल पांढऱ्या रंगाचा ट्रक ताब्यात घेतला. पुढील तपास पोलीस नाईक गणेश गवारी करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.