दहशतवादासाठी पैसा गोळा करणारे रॅकेट दिल्लीत उघड

छाप्यांवेळी दीड कोटींची रोकड जप्त
नवी दिल्ली – राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) देशाची राजधानी दिल्लीत दहशतवादासाठी पैसा गोळा करणारे रॅकेट उघडकीस आणले. ते रॅकेट पाकिस्तानस्थित खतरनाक दहशतवादी हाफिज सईद याचे फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशन (एफआयएफ) चालवत असल्याचे स्पष्ट झाले.

दिल्लीतील काही जणांना परदेशांत राहणाऱ्या एफआयएफच्या सदस्यांकडून हवालामार्गे पैसे मिळतात. त्या पैशांचा वापर दहशतवादी कृत्यांसाठी केला जातो, असे एनआयएच्या निदर्शनास आले. त्यावरून एनआयएने मोहम्मद सलमान, मोहम्मद सलीम आणि राजाराम या तीन संशयितांशी संबंधित ठिकाणांवर मंगळवारी छापे टाकले. त्या कारवाईवेळी तब्बल 1.56 कोटी रूपयांची रोकड, 14 मोबाईल फोन आणि 5 पेन ड्राईव्ह जप्त करण्यात आले. याशिवाय, सलमान, सलीम आणि सज्जाद अब्दुल वाणी अशा तिघांना अटक करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चौकशीतून सलमान पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातीमधील काही जणांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली. भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तान आणि अमिरातीमधून पैसा पाठवला जात असल्याचेही स्पष्ट झाले. सामाजिक कार्याचे ढोंग करण्यासाठी हाफिजने 1990 मध्ये एफआयएफची स्थापना केली. मुंबईतील महाभयंकर दहशतवादी हल्ल्यांचा (26/11) सूत्रधार असणारा हाफिज लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)