दहशतवादाबाबत अफगाणिस्तानने केली पाकिस्तानची पोल खोल

वॉशिंग़टन – दहशतवादाबाबत पाकिस्तानची दुटप्पी भूमिका अफगाणिस्तानने उघड केली आहे. वॉशिंग्टन येथील परराष्ट्र व्यवहार परिषदेत पाकिस्तानची पोलखोल केली आहे. पाकिस्तान तालिबानला सतत मदत करत असून पंतप्रधान इम्रान खान यांचे यांचे नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतरही पाकिस्तानच्या धोरणात कोणताही बदल झाला नसल्याचे अफगाणिस्तानचे मुख्य कार्यकारी अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी सांगितले.

शांती आणि चर्चा यासाठी काही गोष्टी आवश्‍यक असतात, ही गोष्ट पाकिस्तानसारख्या तालिबानला मदत करणाऱ्या राष्ट्रांना समजावण्याची आवश्‍यकता आहे असे सांगून अब्दुल्ला यांनी पुढे सांगितले की शांतीसाठी प्रयत्न करण्याचे आणि तालिबानला चर्चेसाठी तयार करण्याचे आणि इतरांवर दबाव आणण्याचे पाकिस्तानने कबूल केले होते. मात्र त्याबाबतीत पाकिस्तानने काहीही केले नाही. दहशतवादापासून काहीही लाभ नाही ही गोष्ट पाकिस्तानला समजावण्याची आवश्‍यकता असल्याचे त्यांनी सांगितले. भारत गेली 17 वर्षे स्थिर आणि शांतिपूर्ण अफगाणिस्तानसाठी मदत करत असल्याचा अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी उल्लेख केला आहे

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तालिबानचे प्रतिनिधी आण्‌÷िअफगाण सरकारचे प्रतिनिधी मंडळ यांची या आठवडयात सौदी अरबमध्ये भेट झाली. अफगाणिस्तानात पुढील महिन्यात होणारी संसदीय निवडणूक आणि कैद्यांची मुक्तता याबाबत त्यांच्यात चर्चा झाली. शांतिपूर्ण निवडणुकीसाठी अफगाण अधिकाऱ्यांनी मदतीचे आवाहन केल्याचे तालिबानच्या प्रतिनिधीने म्हटले आहे.
20 ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी काही कैद्यांना मुक्त करण्याबाबत अफगाण प्रतिनिधींनी मान्यता दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)