दहशतवादाचा संघटीत मुकाबला…

File photo

काठमांडू – दहशतवादाला प्रोत्साहन आणि मदत करणाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी त्याविषयीची जबाबदारी निश्‍चीत करण्याची गरजही या जाहीरनाम्यात व्यक्त करण्यात आली आहे. दहशतवादाचे कोणत्याही कारणासाठी समर्थन होऊ शकत नाही आणि कोणीच ते करू नये असे नमूद करून संपुर्ण जगातील दहशतवादाची कठोर शब्दात आलोचनाही या जाहीरनाम्यात करण्यात आली आहे.

दहशतवादाने साऱ्या जगाला आणि बिमस्टेक मधील सदस्य राष्ट्रांच्या शांततेलाही मोठे आव्हान निर्माण केले असून त्याचा संघटतीपणे मुकाबला करण्याचा निर्धार या संघटनेने जाहीनाम्यात व्यक्त केला आहे. दहशतवादी कारवाया करणारे गट, त्यांच्या संघटना किंवा त्यांच्या नेटवर्कवर नुसती कारवाई करून चालणार नाहीं तर त्यांना पाठिशी घालणाऱ्या आणि आश्रय देणाऱ्यांच्या विरोधातही ही संघटना लढा देईल असे यात नमूद करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या जाहींरनाम्यात कोणत्याही देशाचे नाव घेण्यात आलेले नाही. तथापी दहशतवादाला खतपाणी घालून त्यांना आश्रय देण्याचे काम पाकिस्तान सातत्याने करीत असल्याचा आरोप विविध देशांकडून आत्तापर्यंत झाला आहे. दहशतवादाच्या विरोधात सर्व सदस्य देशांनी सुरक्षा व गुप्तचर यंत्रणां यात व्यापक समन्वय घडवण्याचा निर्धारही या संघटनेने व्यक्‍त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)