दलित वस्ती सुधार योजना झालेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करा

File Photo

कोल्हापूर  – कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांनी सन 2016-17 मध्ये दिलेला लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेचा 75 टक्के निधी खर्च झाल्या खेरीज सन 2017-18 साठीचा आलेला निधी वितरीत करण्यात येणार नाही, असे सांगून झालेल्या कामांची सामाजिक न्याय विभागाने प्रत्यक्ष पाहणी करावी, अशा सक्त सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित नागरी वस्ती सुधार योजना खर्चाचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, नगर प्रशासनाचे नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

चंद्रकांत पाटील म्हणाले की,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित नागरी वस्ती सुधार योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यामध्ये 2016-17 मध्ये झालेल्या कामांची सामाजिक न्याय विभागाने प्रत्यक्ष जागेवर जावून पाहणी करावी त्यासाठी नियोजन करावे. नागरी वस्ती सुधार योजनेतील कामे गुणवत्तापूर्ण होणे आवश्यक आहे त्यादृष्टीने समाज कल्याण‍ विभागाने दक्ष रहावे, असे निर्देश दिले. आपण स्वत: काही ठिकाणी कामांच्या पाहणीसाठी जाणार असल्याचे त्यानी यावेळी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)