दलाई लामाचा उत्तराधिकारी निवडण्याचा अधिकार चीनला नाही

अमेरिकेचे संयुक्‍त राष्ट्र परिषदेत स्पष्टीकरण

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावर चीन आणि अमेरिकेतील शीतयुद्ध सगळ्या जगाला माहिती आहे. त्यातच आता अमेरिकेने बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडीवरुन धक्‍कादायक वक्‍तव्य केले आहे. धर्मगुरू दलाई लामा यांच्या निवडीचा अधिकार चीनला नसल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. दरम्यान,अमेरिकेच्या या वक्‍तव्यावर चीनकडून अद्याप काही प्रतिक्रिया आली नाही.

आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यासाठी अमेरिकेचे राजदूत सॅम ब्राउनबॅक यांनी याविषयी वक्‍तव्य केले आहे. दलाई लामाचा उत्तराधिकारी निवडण्याचे अधिकार चीनला नाही. ते युनायटेड नेशन्समध्ये म्हणाले, ‘दलाई लामाचा वारसदार ठरविण्याचा चीन सरकारला अधिकार नसल्याचे अमेरिकेने सांगत याविषयी संयुक्‍त राष्ट्राने आपली भूमिका स्पष्ट ठेवायला हवी असे म्हटले आहे. तसेच दलाई लामा यांचा उत्तराधिकारी निवडण्याचा अधिकारी चीनला नसून तिबेटी बौद्ध धर्मगुरूंना असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

दलाई लामा यांच्या उत्तराधिकाऱ्याचा विषय धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांची काळजी घेणाऱ्या युरोपियन सरकारने उभा केला पाहिजे असे सांगत अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांनी हा मुद्दा उपस्थित केला पाहिजे असेही म्हटले आहे. हे जगातील इतर आंतरराष्ट्रीय संस्था आणि सरकारने वाढविले पाहिजे. युरोपियन सरकारांनी, विशेषत: ज्यांना धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांची काळजी आहे त्यांनी ते स्वीकारले पाहिजे.

Leave A Reply

Your email address will not be published.