पुणे,दि.24- दरोड्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना हडपसर पोलिसांनी जेरबंद केले. एका सराफी दुकानावर दरोडा टाकून तेथील किंमती ऐवज लूटण्याचा कट आरोपींनी रचला होता. हडपसर पोलिसांच्या गस्ती पथकाला माहिती मिळताच सापळा रचून आरोपींच्या मुसक्या अवळण्यात आल्या.
योगीराज संदीप पानसरे(20,रा.हडपसर), दिनेश धनंजय राखपसरे(19,रा.मांजरी), रोहीत सोनकांबळे(21,रा.मांजरी), गणेश उर्फ दादा हवालदार(20,रा.मांजरी) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून लोखंडी कोयता,कटावणी, एक्सा ब्लेड, स्क्रु ड्रायव्हर, मिरची पुड, दोरी आणी दुचाकी असा 30 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. हडपसर पोलिसांची गस्ती पथक गस्त घालत असताना पोलीस शिपाई नितीन मुंढे व पोलीस शिपाई विनोद शिवले यांना भागीरथी नगर साडेसतरा नळी येथे काही व्यक्ती दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची खबर मिळाली होती. त्यानूसार योगीराज , दिनेश आणी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत ते राहीत व गणेश यांच्या सहकार्याने एका सराफी दुकानावर दरोडा टाकणार असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त सुनिल फुलारी, पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त सुनिल कलगुटकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, पोलीस निरीक्षक हमराज कुंभार यांच्या सूचनेनूसार सहायक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहायक पोलीस फौजदार युसुफ पठाण, पोलीस हवालदार संपत औचरे, राजेश नवले, सैदोबा भोजराव, विनोद शिवले, नितीन मुंढे, अकबर शेख, शशिकांत नाळे , विजय पवार यांच्या पथकाने केली आहे.