मुंबई – मुंबै बॅंक बोगस मजुर प्रकरणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा राजीनामा घेण्याच्या मागणीसाठी “आप’ने आक्रमक भूमिका घेतली आहे. यासाठी मुंबई भाजप कार्यालयाबाहेर आपच्या कार्यकर्त्यांनी आज जोरदार आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली. तसेच प्रवीण दरेकरांच्या अटकेची मागणी केली आहे. पंजाब विधानसभेत बाजी मारल्यानंतर व मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना आम आदमी पक्ष मुंबईमध्ये सक्रिय झाल्याने या आंदोलनाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. याप्रसंगी घोषणाबाजी देणाऱ्या आपच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली. दरम्यान सहकार्य न करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक बोगस मजूर प्रकरणात प्रवीण दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर दरेकरांनी अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.
यानंतर त्यांनी सत्र न्यायालयात अर्ज केला. मात्र सत्र न्यायालयाने देखील त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. यामुळे दरेकरांची अटक तुर्तास टळली आहे.