दप्तराचे ओझे पेलवेना!

वडगाव मावळ – मावळ तालुक्‍यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळातील विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांना आजार होत असून विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याची मागणी पालक करत आहेत.

मावळ तालुक्‍यात इंग्रजी माध्यमाच्या शाळेत वयाच्या तीन वर्षांपासून बालकांना प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनिअर के. जी. व सिनिअर के. जी. त्यानंतर पहिलीत प्रवेश दिला जातो. या मुलांच्या शारीरिक क्षमतेचा विचार न करता, शाळेच्या वतीने त्यांना क्रमिक पुस्तके, वह्या, प्रात्यक्षिक वह्या, त्यात जेवणाचा डब्बा, पाण्याची बॉटल आदींचे सुमारे 6 ते 8 किलो दप्तराचे ओझे पहिलीच्या विद्यार्थ्यांना असते. तर प्राथमिक व माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना अधिकच दप्तराचे असते. काही मुलांना दप्तराचे ओझे पेलवत नसल्याने त्यांचे पालकच दप्तराचे ओझे वाहण्याचे काम करतात. शाळा विद्यार्थ्यांना सर्वच पुस्तके व वह्या आणण्याची सक्ती करते अथवा वही व पुस्तके घरी राहिल्यावर दंड केला जातो या भीतीने नाईलाजाने दप्तराचे ओझे वाहावे लागत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काही विद्यार्थ्यांना दप्तराचे अधिक ओझे वाहत असताना, त्यांच्या पाठीचे दुखणे सुरु झाले आहेत. शाळा वर्गाच्या सर्वच वह्या व पुस्तके आणण्यासाठी विद्यार्थ्यांना सूचना करत असते. एकतर तीन वर्षांपासूनच इंग्रजी शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी त्या बालकाची शारीरिक व मानसिक वाढ कमजोर झाल्याने त्यांना दप्तराचे अधिक ओझे दिल्याने ते दबून जातात. एकाच दिवसी सर्व विषयाचा अभ्यास करायचा असल्याने सर्वच पुस्तके, वह्या व प्रात्यक्षिक वह्या आणण्याचा आग्रह धरला जातो. त्यात विद्यार्थ्यांचे पालक सोबत नसतील तर स्कूल वाहन चालकांना या दप्तराचे ओझे उचलावे लागते. या शाळांमध्ये पूर्वी पाठीचा वापर अधिक केला जात होता, पण आता पाटी गायब करून सर्व वह्या व प्रात्यक्षिक पुस्तके आणण्यास सांगितले जात असल्याने पालकांच्या खिशाला झळ बसत आहे. तर पुस्तके, वह्या व प्रात्यक्षिक वह्या बनविण्यासाठी वृक्षांची तोड करावी लागत आहे. हजारोचे डोनेशन देवून प्रवेश मिळाल्यावर दप्तराचे त्यातच शिकवणी त्याचे ओझे मुलांचा जीव दप्तराच्या ओझ्याखाली दबून जात असल्याने इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याची मागणी पालक करत आहेत.

इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या मुख्याध्यापकांना मुलांना आवश्‍यक असणारीच पुस्तके व वह्या आणण्याची सक्ती करावी. विनाकारण दप्तराचे ओझे होणार नाही याची दक्षता मुख्याध्यापक व वर्ग शिक्षकांनी घेण्याची सूचना दिली आहे. ज्या शाळा मुलांच्या दप्तराचे ओझे कमी करणार नाहीत त्या शाळांवर कारवाई करण्यात येईल.
– मंगल वावळ, गट शिक्षण अधिकारी, मावळ पंचायत समिती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)