दगडफेक करणारे 80 जण ताब्यात

रात्री उशिरापर्यंत धरपकड सुरू; पोलीस कुमक वाढवली

सातारा, 25(प्रतिनिधी )
मराठा मोर्चा नंतर महामार्गावरील जमाव तसेच पोलिसांवर अचानक दगडफेक करणाऱ्या 80 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. बुधवारी दुपारी सुरू झालेल्या दगडफेकीत जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांच्यासह 21 पोलिस जखमी झाले होते. दगडफेक करणाऱ्यांनी पोलिसांच्या गाड्या व पोलिसांनाच लक्ष केल्याने महामार्गावर दुपार पर्यंत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दगडफेकीत दुकाने, शोरूमचे नुकसान झाले.या घटने नंतर दगडफेक करणाऱ्यां 80 समाजकंटकांना पोलिसांनी ताब्यात घेतले . तर बाकी दगडफेक करणाऱ्या बाकींच्यांची धरपकड रात्री उशीरा पर्यंत सुरू होती.
मराठा क्रांती मोर्चा समाप्त झाल्यानंतर दुपारी 12 वाजता महामार्गावर जमाव जमला होता. या घटनेची माहिती साताऱ्याचे पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांना मिळाताच त्यांनी जमावाला शांततेचे आवाहन केले. मात्र जामावातील काहीजणांनी थेट पोलिसांच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरूवात केली. यावेळी स्वत: संदीप पाटील जमावाला वेळोवेळी शांततेचे आवाहन करत होते. यावेळी जामवातील काही लोकांनी त्यांच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरूवात केली. त्यात संदीप पाटील यांच्या डाव्या हाताच्या बोटाला दगड लागाला. त्यात ते जखमी झाले .त्यांच्या गाडीवरही दगडफेक झाली. त्यानंतर पोलीसानी बळाचा वापर करत जमावाला पागंवण्याचा प्रयत्न केला. पण जमाव हिंसकपणे पोलिसांच्या दिशेने चाल करू लागल्याने अखेर अश्रृधुराच्या नळकांड्या फोडल्या. दरम्यान, एसपी संदीप पाटील यांना उपचारासाठी तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर पोलिस उपअधिक्षक गजानन राजामाने यांच्यासह,स्था. गु. शाखेचे पद्माकर घनवट, स.पो.नि. श्रीकृष्ण पोरे, पोलिस उपनिरीक्षक नानासाहेब कदम यांच्यासह सातारा शहर, शाहूपुरी,सातारा तालुका व राज्यराखीव पोलिस दलाचे 21 अधिकारी, कर्मचारी जखमी झाले आहेत. दरम्यान जिल्हा पोलिस प्रमुखांसह सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी किरकोळ उपचार घेवून तातडीने दंगा सुरु असलेल्या भागाकडे धाव घेतली. पोलिसांनी यावेळी शांतता प्रस्थापीत करण्यासाठी निकराचे प्रयत्न केले. जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी वाढीव पोलिस कुमक मागवत दुपारनंतर जमावावर नियंत्रण मिळवले. जिल्हा पोलिस प्रमुख व त्यांच्या दलाने संतप्त जामावाला पांगवुन शहरात शांतता प्रस्थापित केली. पोलिसांच्या या कामगिरीचे जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवथारे,कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी कौतुक केले. दरम्यान पोलिस अधीक्षक यांनी साताऱ्यातील परिस्थिती निवळली असल्याचे सांगून परिस्थीती नियंत्रणात असल्याचे सांगितले आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)