दखणेत अज्ञात चोरट्यांनी टीव्ही चोरला

पिरंगुट- दखणे (ता. मुळशी) येथे चोरट्यानी सहा घरांचे कडीकोयंडे उचकटून चोरीचा प्रयत्न केला. या घटनेत एका घरातील 25 हजार रुपयांचा टीव्ही चोरीला गेला आहे.
22 जुलै रोजी दाखणे गावचे उपसरपंच सुनील गोपाळ दाभाडे, तानाजी मारूती दाभाडे, सोमनाथ सतू दाभाडे, नथू पांडू दाभाडे, निवृत्ती नामदेव दाभाडे, राजू मल्हारी नाकती तसेच ग्रामपंचायत कार्यालयाचे कडी कोयंडे उचकटून चोरीचा प्रयत्न झाला आहे. यामध्ये सुनील दाभाडे यांच्या बंगल्याच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून घरातील 25 हजार रुपयांचा टीव्ही चोरीला गेला आहे. तसेच घरातील वस्तू अस्ताव्यस्त केल्या आहेत. याप्रकरणी सुनील दाभाडे यांनी पौड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)