दंगल प्रकरणात हार्दिक पटेल यांना दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा

मेहसाणा – पटेल आंदोलनाच्यावेळी सन 2015 मध्ये विसनगर गावात झालेल्या दंगलीच्या प्रकरणात पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल आणि त्यांच्या अन्य दोन सहकाऱ्यांना प्रत्येकी दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली आहे. स्थानिक सत्र न्यायाधिश व्ही. पी आगरवाल यांनी त्यांना ही सजा सुनावली.

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, जाळपोळ, बेकायदा जमाव जमवणे इत्यादी आरोपांखाली त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. या तिघांना प्रत्येकी पाच हजार रूपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणातील अन्य चौदा आरोपींना मात्र सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. त्या गावांतील आंदोलनाच्यावेळी आंदोलकांनी स्थानिक भाजप आमदार ऋषीकेश पटेल यांच्या कार्यालयाची व त्यांच्या गाडीची मोडतोड केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)