थोरात स्कूलमध्ये संवाद सेतू कार्यक्रम उत्साहात

डिकसळ – भिगवण (ता. इंदापूर) येथील राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान संचलित विट्टलराव थोरात इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये संवाद सेतू दोन शब्द किशोरवयीन विद्यार्थ्यांकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अलीकडच्या काळात विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यातील संवाद हरवलेला आहे. समाजातील अरीष्ठ व अराजक प्रवृत्तीमुळे घरातील असलेल्या सु-संस्काराचा प्रभाव सुद्धा कमी होत आहे. यामुळे युवा पिढीचे भवितव्य घातक बनले आहे. त्यांना या गर्तेतून बाहेर काढण्याकरिता आपलाही खारीचा वाटा असावा, या उद्देशाने संवाद सेतू ग्रुप स्थापन करण्यात आला आहे. यामध्ये पौगंडा अवस्थेतील शालेय मुला-मुलींमधील बदललेली मानसिकता, त्यांचे वर्तणूक व त्यामुळे मनावर-जीवनावर होणारे विपरीत परिणाम या बाबी लक्षात घेता मुलांना प्रबोधनाची गरज भासू लागली आहे. मानसिक दबावामुळे होणाऱ्या आत्महत्या या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. या ग्रुपच्या माध्यमातून डॉ. जयश्री गांधी, डॉ. जयप्रकाश खरड, डॉ. प्राची थोरात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बापूराव थोरात, सचिव विजय थोरात समवेत शिक्षक व पालक उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)