थेऊर मतदान केंद्रावर नेला मोबाइल

चित्रीकरण करणाऱ्यावर गुन्हा दाखल

लोणी काळभोर – निवडणूक आयोगाने मतदान केंद्रात चित्रीकरण करण्यास बंदी घातलेली असतानाही शिरूर लोकसभा मतदारसंघातील थेऊर (ता. हवेली) येथील एका केंद्रात मोबाइलवर चित्रीकरण करून शासकीय आदेशाचे उल्लंघन केले म्हणून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणी काळभोर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी अशोक केशव देशमुख (वय 48, रा. नळवणे, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किरण रामभाऊ काकडे (रा. थेऊर, ता. हवेली) याच्या विरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशमुख हे खटकाळे (ता. जुन्नर) येथे असलेल्या शासकीय उच्च माध्यमिक आश्रम शाळेत प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांची लोकसभा निवडणुकीत थेऊर येथील केंद्र क्रमांक 313 येथे केंद्राध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यांच्यासोबत सहकारी म्हणून शितल सुरेश गोरे, आनंद नारायण संत, नारायण बबन पडवळ, दत्तात्रय रामदास शिंदे व बिरा मारुती गुलदगड यांची नेमणूक करण्यात आली होती.

मतदानाच्या दिवशी सोमवारी (दि. 29) सकाळी 9 ते 10 वाजण्याच्या सुमारांस मतदार यादीतील अनुक्रमांक 125 मधील मतदार किरण काकडे हा मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आले असता त्याने मतदान केंद्रावर मोबाइल घेऊन जाण्यास बंदी असताना आणि मतदान प्रक्रिया सुरू असताना निवडणूक आयोगाने मतदान केंद्रात चित्रीकरण करण्यास बंदी घातलेली असतानाही मोबाइल जवळ बाळगून चित्रीकरण केले. यांमुळे सरकारी आदेशाचे उल्लंघन व मतदानाच्या गोपनीयतेचा भंग झाला म्हणून देशमुख यांनी त्यांच्या विरोधांत फिर्याद दिली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.