“त्या’ 280 कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार

पिंपरी – महापालिकेच्या प्रशासन विभागाने चार दिवस केलेल्या तपासणीमध्ये उशीरा येणारे, गैरहजर असणारे तसेच केवळ उपस्थिती लावून पळ काढणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. तपासणीमध्ये 280 कर्मचारी बेशिस्त असल्याचे समोर आले आहे.

प्राशासन विभागाने यासाठी दोन विशेष पथकांची नेमणूक केली आहे. ज्यामध्ये प्रत्येकी आठ अशा 16 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे पथक अचानकपणे महापालिका प्रशासकीय इमारत, दवाखाने, क्षेत्रीय कार्यालये येथे भेट देत आहे. सुरुवातील दररोज ही भेट दिली जाणार आहे. मात्र कर्मचाऱ्यांना शिस्त लागल्यानंतर गरजेनुसार ही भेट दिली जाणार आहे. सध्या सुरु असलेल्या पाहणीसाठी मंगळवारी (दि. 25) 126, बुधवारी (दि. 26) 64 तर गुरुवारी (दि. 27) 74 व शुक्रवारी (दि. 28) 13 कर्मचारी बेशिस्त असल्याचे पाहणीत समोर आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संबंधीत कर्मचाऱ्यांबाबतची विचारणा त्या विभागाच्या विभाग प्रमुखाला केली जाईल, कारण सुरुवातील विभाग प्रमुखाने कर्मचाऱ्यावर कारवाई करणे अपेक्षीत आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. अद्याप कोणावरही महापालिकेने कारवाई केलेली नाही. या मोहिमेअंतर्गत कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी एवढाच हेतू आहे.

नागरिक व नगरसेवकांनी संबंधीत अधिकारी कार्यालयात उपस्थितच नसतात मग आम्ही आमच्या समस्या कोणाकडे मांडणार किंवा माहिती कोणाकडून घेणार, अशी ओरड महापालिका सभेत महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्याकडे केली होती. त्यानुसार आयुक्त हार्डीकर यांनी ही मोहीम हाती घेतली आहे. तसेच ही मोहीम दिखावा नसून ती कायमस्वरुपी राबवणार असल्याचा दावा प्रशासन विभागाने केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)