…त्या वेळी भारतीय क्रीडा विश्वामध्ये ‘पी टी उषा’ या ताऱ्याच्या उदय झाला – सचिन तेंडुलकर

हॉकीमधील सर्वकालीन महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांची आज ११३ जयंती आहे. मेजर ध्यानचंद यांनी भारताला ऑलंपिकमध्ये हॉकी खेळात ३ सुवर्ण पदके जिंकून देण्यात मोठा वाटा उचलला होता. त्यांच्या स्मरणात २९ ऑगस्ट हा दिवस भारतामध्ये ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून साजरा केला जातो.

दरम्यान, माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने पी टी उषा यांचे कौतुक केले आहे. सचिन म्हणाला, ८०च्या दशकांमध्ये जेव्हां मी माझ्या कारकिर्दीची सुरवात करत होतो. त्या वेळी भारतीय क्रीडा विश्वामध्ये पी टी उषा या ताऱ्याच्या उदय झाला होता. एका छोट्या खेळातून येऊन उतुंग कामगिरी करणे हे आश्यर्यजनक तसेच स्फूर्तिदायक आहे. पी टी उषा यांनीच खऱ्या अर्थाने मैदानी खेळांना रुजवले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/sachin_rt/status/1034756771531784193

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)