“त्या’ महिलेच्या घातपाताची शक्‍यता

पिंपरी – थेरगाव येथील बंधाऱ्यात रविवारी (दि. 22) सकाळी सापडलेल्या अनोळखी महिलेची ओळख फेसबुकमुळे पटली आहे. ती महिला निगडी ओटास्किम येथील रहिवासी असून तिच्यावर देखील काही गुन्हे नोंद आहे. त्यामुळे त्या महिलेचा घातपात झाला असल्याची दाट शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

या महिलेच्या भावाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.19) ती रात्रभर घरी आली नाही. तेव्हा तिच्या भावाने देहूरोड येथील तिच्या मित्राकडे चौकशी केली असता, ती तिच्या अन्य तीन मित्रांसह देहूरोड येथील एका वाईन शॉपमधून बियरचा बॉक्‍स घेऊन गेली होती, असे त्या मित्राने सांगितले. ते मित्र पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)