“त्या’ बलात्कारपिडीतेला हायकोर्टाने गर्भपातास परवानगी नाकारली

मुंबई – अल्पवयीन बलात्कार पिडीत मुलीला गर्भपात करण्याची परवानगी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. वैद्यकिय अहवालानंतर न्यायालयाने हा निर्णय देताना तिची प्रसुतीची जबाबदारी सोलापूर सरकारी दवाखान्याच्या मुख्य डॉक्‍टरांवर सोपविली. दरम्यानच्या कोणताही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्या आणि त्या मुलीच्या प्रसुतीनंतर डीएनए अहवाल सादर करा, असा आदेशही दिला.

सोलापूर जिल्ह्यातील अकलूज गावातील एका अल्पवयीन मुलीच्या वडीलांनी मुलीच्या गर्भपातासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याकिचेवर न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकील ऍड. कविता सोळूके यांनी केईएम रुग्णालायाचा 10 डॉक्‍टरांच्या विशेष पथकांचा अहवाल न्यायालयात सादर केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या अहवालात गर्भपात करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याचे न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिले. तसेच मुलीची चेंबरमध्ये चर्चा करावी अशी विनंती केली. मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावली. गर्भवती मुलीच्या जिवाला आणि गर्भला कोणताही धोका नसल्याने गर्भपात करू नये. तसेच गर्भाची पूर्ण वाढ झाल्यानंतर तिची सोलापुरच्या सरकारी दवाखान्यात प्रसुती करून डीएनए अहवाल सादर करा. याची दक्षता घ्यावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)