त्या’ प्रणालीमध्ये माहिती भरण्यात “जिल्हा परिषद’ प्रथम

आता एका क्‍लिकवर निधी वितरणाची माहिती उपलब्ध होणार; 

गावचा विकास आराखडा तयार करण्याच्या दिल्या होत्या सूचना

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 29 – “आमच गाव, आमचा विकास’ उपक्रमाअंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा प्लॅन प्लस प्रणालीमध्ये माहिती भरण्यात, पुणे जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे नवीन कामे सुचविण्याबाबत ऑनलाइन प्रणालीमध्ये सुविधा देण्यात आली असून, या ऑनलाइनमुळे एका क्‍लिकवर निधी वितरणाची माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कामांना गती आणि निधीवर नियंत्रण राहणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली.

चौदाव्या वित्त आयोगाच्या निर्देशानुसार “आमच गाव, आमचा विकास’ उपक्रमाअंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीचा विकास आराखडा http://planningonline.gov.in (प्लॅन प्लस) या संकेतस्थळावर भरणे आवश्‍यक होते. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील एकूण 1 हजार 399 ग्रामपंचायतींचे 2018-19 मध्ये तयार केलेले विकास आराखडे प्लॅन प्लस या प्रणालीवर अपलोड करण्यात आले आहेत. नागरिकांना यामुळे ग्रामपंचायतींची चौदाव्या वित्त आयोग व इतर निधीतून “आमच गाव, आमचा विकास’ या उपक्रमाअंतर्गत घेतलेल्या कामांची माहिती प्लॅन प्लसच्या एका क्‍लिकवर मिळणार आहे.

प्लॅन प्लस आज्ञावलीमध्ये घेतलेली कामे ऍक्‍शन सॉफ्ट पोर्ट होऊन सदर कामांवर केलेला खर्च व कामांची प्रगती नागरिकांना पाहता येईल. वेगवेगळ्या ग्रामपंचायतींनी घेतलेल्या नाविन्यपूर्ण कामांची माहिती इतरांना सहज उपलब्ध होणार आहे. शासनस्तरावर ग्रामपंचायतीने घेतलेल्या कामापासून किती मालमत्ता तयार झाली, त्याची माहिती मिळण्यास मदत होईल. शासनास ग्रामपंचायत स्तरावर निधी वितरणाकरीता या प्रणालीचा फायदा होणार आहे. तर, ग्रामस्थांना नवीन कामे सुचविण्याबाबत या प्रणालीचा अधिक फायदा होणार आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्याने यामध्ये प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल अध्यक्ष विश्‍वास देवकाते, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, उपमुख्य कार्यकारी संदीप कोहीणकर यांनी सर्व तालुक्‍यांचे गटविकास अधिकाऱ्यांचे, विस्तार अधिकारी, ग्रामसेवकांचे कौतूक केले आहे.

———————————–
गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांच्या मेहनतीमुळे विकास आराखडा वेळेत पूर्ण करून या प्रणालीमध्ये भरण्यात आली. पंचायत विभागाच्या या प्रयत्नाने पुणे जिल्हा परिषदेने प्रथम क्रमांक पटकवला. या प्रणालीमुळे सर्व माहिती एका क्‍लिकवर मिळणार आहे. त्यामुळे निधीचे वितरण सुलभ होणार असून, त्यावर लक्ष ठेवता येणार आहे. तसेच विकास कामांना गती मिळणार आहे.
– संदीप कोहीणकर , उपमुख्य कार्यकारी अधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)