‘त्या’ पाच जणांची ओळख युपीए सरकारच्या काळातच

गृह मंत्रालाचा खुलासा

नवी दिल्ली – भीमा-कोरेगाव प्रकरणात माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून पाच जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर काही लोकांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत निदर्शने केली. परंतु, याबाबत गृहमंत्रालयाने मोठा खुलासा केला आहे. अटक करण्यात आलेल्या पाचही जणांच्या नावांची ओळख युपीए सरकारच्या काळातच पटवण्यात आली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हंटले कि, डिसेंबर २०१२ मध्ये युपीए सरकारने माओवाद्यांशी संबंधित १२८ संघटनांची माहिती गोळा केली होती. त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याचे आदेशही मनमोहन सिंह सरकारच्या काळात राज्य सरकारला पत्र लिहीत देण्यात आले होते. यामुळे युपीए सरकारच्या यादीत असणाऱ्या व्यक्तींवरच महाराष्ट्र पोलिसांनी कारवाई केल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. या यादीत वरवरा राव, गौतम नवलखा, सुधा भारद्वाज, स्टॅन स्वामी, वरनोन गोन्साल्विज आणि अरूण परेरा  यांचीही नावे सामील असल्याचे गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, अरूण परेरा आणि वरनोन गोन्साल्विज यांना २००७ सालीही अटक करण्यात आली होती. याचप्रमाणे वरवरा राव यांनाही तेलंगणा आणि आंध्र प्रदेश पोलिसांनी अनेक वेळा अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)