‘त्या’ पाकिस्तानी हॉकीपटूवर महाराष्ट्रात होणार उपचार ?

नवी दिल्ली: हृदयविकाराने त्रस्त असलेल्या पाकिस्तानच्या माजी हॉकीपटूवर मुंबईत उपचार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  49 वर्षीय मन्सूर अहमद यांनी हृदय प्रत्यार्पणासाठी भारताकडे विनवणी केली होती. त्यांची ही विनंती फोर्टिस ग्रुपने मान्य केली आहे. फोर्टिस ग्रुप हॉस्पिटल्सने मुंबई आणि चेन्नईत हार्ट ट्रान्सप्लांट अर्थात हृदय प्रत्यार्पण शस्त्रक्रिया मोफत करण्याची ऑफर दिली आहे.

मन्सूर अहमद यांच्यावर सध्या कराचीतील जिन्ना पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान, मन्सूर अहमद यांनी आर्थिक मदतीची गरज आहे की नाही हे अजून स्पष्ट केलेलं नाही. त्यांनी मेडिकल व्हिजा मिळावा अशी विनंती भारत सरकारकडे केली आहे. 

फोर्टिस रुग्णालयाचे विभागीय संचालक (मुंबई) डॉ. एस नारायणी यांच्या माहितीनुसार, “सराकरने मन्सूर अहमद यांना मेडिकल व्हिजा दिला, तर आम्ही त्यांची मुंबई आणि चेन्नईत हृदय प्रत्यार्पण शस्त्रक्रियेसाठी नोंदणी करु. व्हिजा मिळाल्यानंतर अहमद हे प्रवासासाठी फिट आहेत की नाही, याची तपासणी करु” दरम्यान, महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनीही अहमद यांना उपचारासाठी हिरवा कंदील दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)