‘त्या’ पाकिस्तानी युवकाला मरायचं होतं भारतीय जवानांकडून

श्रीनगर : आपल्या प्रेयसीसोबत लग्न न झाल्याने एका पाकिस्तानी तरुणाने आपला मृत्यू व्हावा यासाठी थेट सीमारेषा (एलओसी) गाठली. सीमारेषेवर भारतीय बीएसएफ जवान गोळ्या घातलील आणि आपला मृत्यू होईल अशी या तरुणाला अपेक्षा होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय मोहम्मद आसीफ याला बीएसएफच्या ११८ बटालियनने पकडलं आहे. सोमवारी मॅबोके सीमारेषेवर त्याला पकडण्यात आलं. यानंतर बीएसएफ अधिकाऱ्यांनी त्याला पोलिसांच्या हवाली केलं. चौकशीदरम्यान आसीफने अधिकाऱ्यांना सांगितलं की, आपण भारतीय सीमारेषेच्या दिशेने चाल केली कारण बीएसएफ जवान आपल्याला गोळी घालतील असं वाटलं होतं. आसिफ हा पाकिस्तानच्या कसूर जिल्ह्यातील जल्लोके गावचा रहिवासी आहे. प्रेयसीशी लग्न करण्यासाठी त्याने तिच्या घरच्यांकडे परवानगीही मागितली. मात्र दोनवेळा त्याला नकाराला सामोरं जाव लागलं. यानंतर त्याने आपलं आयुष्य संपवण्याचं ठरवलं.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)