त्या’ तीन महिलांचे मृत्यू स्वाइन फ्लूनेच

आणखी एक रुग्ण सापडला : आकडा 41 वर

पुणे, दि.27 – शहरात स्वाइन फ्लूने तीन संशयितांचा मृत्यू झाल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने काही दिवसांपूर्वीच जाहीर केले होते. मात्र यावर शिक्‍कामोर्तब करण्यास पालिकेने दिरंगाई केली होती. या तिन्ही महिलांचे मृत्यू स्वाइन फ्लूमुळेच झाल्याचे अखेर आरोग्य विभागाने सोमवारी जाहीर केले. येणाऱ्या काळात स्वाइन फ्लूबाबत मोठी जनजागृती करण्याची आवश्‍यता असल्याचेही आरोग्य विभागाने म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता स्वाइन फ्लूचा प्रसार वेगाने होत असल्याचे दिसून येते आहे. जानेवारी महिन्यापासून आतापार्यंत रुग्णांची संख्या 41 झाली आहे. तर तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. या तीनही महिलांची माहिती जाहीर केली जाऊ नये, अशी विनंतीही पालिकेने केली आहे. 38 रुग्णांपैकी 12 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. दरम्यान, सोमवारी झालेल्या तपासणीत आणखी एक रुग्ण आढळून आला आहे.

शहरात हल्ली रोज एक ते दोन रुग्णांची चाचणी “पॉझिटिव्ह’ येत आहे. प्रतिबंधात्मक लस येण्यासाठी आणखी एका महिन्याचा कालावधी लागणार आहे. तसेच त्याची संख्याही मर्यादित असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची काळजी स्वत: घेणे गरजेचे झाले आहे.

येत्या काळात सण-उत्सव असल्याने तसेच गणपतीचे दिवस असल्याने गर्दी होणार आहे. त्यामुळेच संसर्ग होण्याआधीच खबरदारीचे उपाय म्हणून नाकाला रुमाल लावणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, आजारी व्यक्‍तींनी वेळीच उपचार घेणे आदी गोष्टी करणे आवश्‍यक आहे.
– डॉ. अंजली साबणे, सहायक आरोग्य अधिकारी, मनपा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)