‘त्या’ आमदाराच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ

जम्मू-काश्मीर : कथुआ सामूहिक बलात्कारातील आरोपीच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये सहभाग घेतलेल्या आमदाराला मंत्रिपदाची शपथ दिल्याने सध्या राज्य सरकारवर टीका होत आहे. भाजपा आणि पीडीपी सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. या दरम्यान जम्मू-काश्मीर विधानसभा अध्यक्ष कविंद्र गुप्ता आणि दुस-या एका आमदाराने मंत्रिपदाची शपथ घेतली.

आमदार राजीव जसरोटिया यांना मंत्री बनवण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये चर्चित असलेल्या कथुआ सामूहिक बलात्कारातील आरोपींच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत राजीव जसरोटिया दिसले होते. तरीही त्यांना मंत्री बनवण्यात आलं आहे.  एका वृत्तवाहिनीने  यासंदर्भात राजीव जसरोटिया यांना काही दिवसांपूर्वी प्रश्नही विचारला होता. त्यावेळी मी रॅलीत सहभागी झालो नसल्याचे जसरोटिया यांनी सांगितले होते. खरे तर आरोपींच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत सहभाग घेतल्यामुळे भाजपाच्या दोन मंत्र्यांना यापूर्वीच राजीनामा द्यावा लागला होता. भाजपा मंत्री लाल सिंह आणि चंद्र प्रकाश गंगा यांनी या महिन्याच्या सुरुवातीलाच राजीनामा दिला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
2 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)