…त्यांनी भ्रष्टाचाराची मुळे घट्ट केली – सोनिया गांधी

नवी दिल्ली – कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी यावेळी मोदी सरकारच्या भ्रष्टाचाराच्या कारभारावर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की या सरकारने देशातील भ्रष्टाचाराची मुळे आणखी घट्ट केली आहेत. त्यांच्या डोक्‍यात कायम केवळ निवडणुकांचेच राजकारण असते असे सांगून त्या म्हणाल्या की या सरकारच्या काळात देशाच्या घटनात्मक संस्थांवरच हल्ला करण्यात आला आणि त्या कमकुवत करण्यात आल्या.

देशाची न्याय व्यवस्था अत्यंत बिकट परिस्थितीतून जात असून माध्यमांचा व पत्रकारांचाही आवाज सध्या दाबून टाकला जात आहे. या साऱ्या वातावरणात देश अत्यंत बिकट अवस्थेतून जात असून या स्थितीकडे गांभीर्याने बघण्याची आपली जबाबदारी आहे. लोकांच्यावतीने आपल्याला हा लढा आता लढायचा आहे असे त्या म्हणाल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)