… तो समाज मृतावस्थेत असतो – सुबोध भावे

पुणे – तणावातून आनंद देण्याचे कार्य कला करते. कला समाज घडवते. ज्या समाजात कलेचे महत्त्व नसते तो समाज मृतावस्थेत असतो. कला ही कधीच मरत नाही. एखाद्या देशातील प्रसिद्ध वास्तू किंवा ठिकाणचे असेल तर त्या मागेही कलाकार असतो. समाजाला आनंद देण्याचे काम कला करत असते. कलाकार हा नेहेमी प्रेक्षकांच्या आनंदासाठी काम करत असतो, असे मत अभिनेता सुुबोध भावे यांनी व्यक्त केले.

नटरंग ऍकडमीतर्फे देण्यात येणारा “शाहीर मधु कडू स्मृती नटरंग प्रतिष्ठान कलागौरव पुरस्कार’ लेखक, अभिनेता, दिग्दर्शक सुबोध भावे यांना पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या पुरस्कार सोहळ्याला नगरसेवक दीपक मानकर, नगरसेविका गायत्री खडके, गिरीजा बापट, अभिनेत्री लीला गांधी, विजय कडू आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बापट म्हणाले, सुबोध हा देशपातळीवरचा कलाकार आहे. लोकमान्य टिळक, बालगंधर्व, कट्यार अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट त्याने सादर केले आहे. या चित्रपटात ऐतिहासिक पात्रांच्या भूमिका साकारल्या आहेत. या भूमिकेतून नव्या पिढीला त्या-त्या व्यक्तिरेखेचे दर्शन झाले आहे. चित्रपटातील उत्तम कलाकार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)