तोडफोड प्रकरणी चौघांना अटक

 थेरगाव – तलवार, लाकडी दांडके आणि दगडाच्या साहाय्याने वाहनांची तोडफोड करणाऱ्या चार 19 वर्षीय तरुणांना अटक करण्यात आली आहे. थेरगाव येथे सोमवारी (दि.23) रात्री एकच्या सुमारास दहा ते बारा जणांच्या टोळक्‍याने गाड्यांची तोडफोड केली होती.

सुनील एकनाथ दिसले (वय-42) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विष्णू सूर्यकांत वाघोले (वय-19), दत्ता किसन बल्लाळ (वय-19), विष्णू राहुल बिराजदार (वय-19), अक्षय कैलास पवार (वय-19, सर्व रा. ताथवडे) यांना अटक करण्यात आली आहे. तर यांच्या अन्य एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगाव येथील पंचशील नगरमध्ये 10-12 जणांच्या टोळक्‍याने सोमवारी (दि. 23) रात्रीच्या सुमारास कार, रिक्षा, दुचाकी टेम्पो अशा एकूण 13 वाहनांची तोडफोड केली. कारमधील टेप चोरून नेला. त्यानुसार मंगळवारी चौघांना अटक करण्यात आली आहे. तोडफोड करणाऱ्या टोळीतील अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे. दहशत पसरविण्यासाठी अशा प्रकारे वाहनांची तोडफोड करण्यात येत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)