तोडफोड, जाळपोळीत दहा कोटींचे नुकसान

चाकण- खेड तालुका सकल मराठा समाजाने आयोजित केलेल्या रास्तारोको व बंदला सोमवारी (दि. 30) काही समाजकंटकांनी गालबोट लावले. यामध्ये तोडफोड व जाळपोळीच्या घटनेत आठ ते दहा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती चाकण सज्जाचे मंडलाधिकारी बाळकृष्ण साळुंके यांनी दिली.
यावेळी एसटी बसेस, पीएमपी बसेस पोलीस विभागाची शासकीय वाहने तसेच खासगी वाहने अशी एकूण 35 चारचाकी व इतर वाहने पेटऊन दिली तर अनेक वाहनांची तोडफोड केली. या हिंसाचारामध्ये विविध शासकीय व खासगी वाहनांचे तोडफोड जाळपोळ करून अंदाजे 8 ते 10 कोटी रुपयांची वित्तहानी केली. तसेच कर्तव्य बजावत असताना पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे व पोलीस कर्मचारी अजय भापकर यांच्यावर जीवघेणा हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले आहे. याबाबतची फिर्याद चाकण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार यांनी दिली आहे. याबाबत सोमवारी रात्री 11.55 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत. घटना स्थळाचे पंचनामे सुरू असून महामार्गावर जळलेली वाहने क्रेनच्या साहाय्याने हटविण्यात आली आहेत.

  • त्यांना आला माणुसकीचा अनुभव
    चाकणमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनामध्ये गुजरात मधील वापी येथील शाळेमधील काही मुलं व शिक्षक सांगली येथे क्रिकेट खेळण्यासाठी जात होती. छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको करण्यात आला त्यामुळे त्यांचे वाहन या रास्तारोकोमध्ये थांबले. यावेळी अचानक हिंसक झालेल्या जमावाने वाहनांवर दगडफेक करत रस्त्यातील वाहने पेटविण्यास सुरवात केली. यावेळी चाकणचे माजी उपसरपंच साजिद सिकिलकर, अतिष मांजरे, निलेश पानसरे, भरत हुलावळे, अशाफक शेख, प्रभातचे चाकणचे वार्ताहर कल्पेश भोई व इतर कार्यकर्त्यांनी त्यांना हाताचे कडे करून येथील जैन मंदिर धर्मशाळामध्ये सुरक्षित पोहच केले. अतिशय भेदरलेल्या अवस्थेत या मुलांना व शिक्षकांना चाकणकरांच्या माणुसकीचा अनुभव आला.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)