तैमूर की सारा अली खान कोण आहे सर्वाधिक लोकप्रिय सुपरस्टार ?

सारा अली खान आणि तिचा लहान भाऊ तैमूर दोन्ही स्टार किड्स गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहेत. करीना आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर अली खान आपल्या जन्मापासूनच सोशल मीडियाचा लाडका आहे. तर अमृता सिंह आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खान गेल्या काही महिन्यांपासून आपल्या बॉलीवूड डेब्यूमुळे मीडियामध्ये चर्चेचा विषय आहे.

सिंबा सिनेमाच्या यशामूळे बॉलीवूडच्या सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत गणली जात असलेली सारा आणि बॉलीवूडमधला सर्वात लोकप्रिय स्टारकिड हे दोघेही आपल्या आई-वडिलांपेक्षा जास्त लोकप्रिय स्टार-किड्स आहेत. ह्या ‘टॉक ऑफ दि टाऊन स्टार किड्स’च्या लोकप्रियतेची तूलना स्कोर ट्रेंड्स इंडियाने केल्यावर जी आकडेवारी समोर आलीय त्यानूसार, डिजिटल न्यूज, न्यूजपेपर आणि वायरल न्यूजमध्ये 100 गुणांसह सारा अली खान पूढे आहे. तर ‘बेबी तैमूर’ने डिजिटल न्यूजमध्ये केवळ 4 टक्के, न्यूजपेपर कव्हरेजमध्ये 12 टक्के आणि व्हायरल न्यूजमध्ये 42 टक्के गुण मिळवलेले आहेत.

तैमूर अली खानची व्हायरल न्यूजमध्ये मजबूत पकड आहे. तो एकुलता एक स्टारकिड आहे, ज्याच्या घराबाहेर त्याच्या एक फोटोसाठी कित्येक तास मीडिया ताटकळत उभी असते. आणि त्याचा एक फोटो इंटरनेटवर आल्यावर मिळाणा-या लाइक्सची संख्या लाखांमध्ये जाते. पण तैमूर आपल्या अपिअरन्सच्याशिवाय न्यूजमध्ये नाही. पण त्याची मोठी बहीण सारा आपल्या डिसेंबरमध्ये रिलीज झालेल्या दोन्ही फिल्म्समूळे न्यूजप्रिंट, डिजीटल न्यूज आणि सोशल मीडियावर सर्वत्र आहे. तिचे इंटर्व्ह्युज, अवॉर्ड फंक्शनमधला प्रेजेंस, बॉलीवूड मॅगझिनच्या कव्हरपेजवर सूध्दा ती झळकल्याने, तिच्याविषयीच्या बातम्या सातत्याने येत असतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)