‘तेव्हा’ वाटलं होतं आता सगळं संपलं – राहुल गांधी

नवी दिल्ली  – कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असतांना विमानात झालेल्या बिघाडादरम्यान आलेला अनुभव राहुल गांधी यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांना सांगितला. दोन तीन दिवसांपूर्वी आम्ही कर्नाटकमध्ये जात असताना आमच्या विमानात बिघाड झाला. त्यावेळी मला वाटलं होतं आता सगळं संपलं. अशा शब्दात त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

दरम्यान  काँग्रेसने दिल्लीत आयोजित केलेल्या जनआक्रोष मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. यावेळीच त्यांनी आपल्या विमानात झालेल्या बिघाडाचाही उल्लेख केला.  खरंतर राहुल गांधी आपले भाषण पूर्ण करून जागेवर बसले होते. मात्र काही वेळातच ते पुन्हा उभे राहिले.

त्यावेळी ते म्हणाले, ” तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहात. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. खरंतर ही गोष्ट सांगायची नव्हती, पण मग विचार केला तुम्ही आपलीच माणसं आहात. म्हणून सांगतो. तुम्हाला  माहीतच असेल दोन तीन दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये जात असताना आमच्या विमानात बिघाड झाला होता.  मला वाटलं सगळं संपलं. पण तेवढ्यात मी कैलास मानसरोवर यात्रा करेन असा विचार मनात आला. सुदैवाने कोणताही अपघात झाला नाही. आता कर्नाटकचा निकाल 12 मे रोजी आहे. त्यानंतर पुढचे 10-15 दिवस तुम्ही मला सुट्टी द्या. म्हणजे मी कैलास आणि मानसरोवराची तीर्थ यात्रा करून येईन.”


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)