तेल, रवा, मैदा, आटा, साखर, डाळींच्या भावात वाढ

मालवाहतुकदारांच्या संपामुळे भुसार बाजारात वस्तूंचा तुटवडा

पुणे – मालवाहतुकदारांच्या संपामुळे भुसार बाजारात अनेक वस्तुंचा काही प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. परिणामी साबुदाणा, शेंगदाणे, रवा, मैदा, आटा, गहू, ज्वारी, बाजरी, डाळी, कडधान्य, तेलाचे भाव वाढले आहेत. आता संप मिटला असून, काही दिवसात वस्तुंचे भाव पूर्वपदावर येतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
सूर्यफुल तेलाच्या डब्याच्या भावात 50 ते 70 रूपयांनी वाढ झाली. साबुदाणा 100 ते 150, शेंगदाणे 150 ते 200, गहू 1500, ज्वारी आणि बाजरीच्या भावात 100 रूपयांनी वाढ झाली. तसेच रवा, मैदा आणि आट्याच्या भावात किंवटलमागे विक्रमी 400 रूपयांची वाढ झाली आहे. तूर, मुग, उडीद, मटकी, मसूर डाळींच्या भावात 200 ते 500 रूपय, तर हरभरा, हुलगा, चवळी, मसूर, मटकी, वाटाणा आदी कडधान्यांच्या भावात 200 ते 300 रूपयांनी वाढ झाली. गुळ, तांदूळ, लाल मिरच्या, पोहे, भाजकी डाळ, भडंग, बेसन, खोबरे, हळद, भगर, सरकी तेल, पाम तेल, सोयाबीन, वनस्पती तेल, खोबरेल तेलाचे भाव मात्र तेजीत असल्याचे व्यापाऱ्यांनी नमूद केले.
20 जुलैपासून विविध मागण्यासाठी वाहतूकदारांनी बेमुदत बंद पुकारला होता. त्यामुळे भुसार बाजारात बहुतांश मालाची आवक थांबली होती. त्यामुळे व्यवहार पूर्णत: मंदावले आहेत. मात्र, आता संप संपला आहे. तरी उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब आणि दक्षिणेतून आवक सुरू झाली आहे. माल येण्यास तीन-चार दिवसांचा कालावधी लागेल. त्यानंतर भाव पूर्वपदावर येतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
किराणा मालाचे भाव पुढीलप्रमाणे ः खाद्यतेले (15 किलो/लिटर) : शेंगदाणा तेल 1500-1650, रिफाईंड तेल ः 1350-1930, सरकी तेल 1080-1240, सोयाबीन तेल 1150-1330, पाम तेल 1000-1040, सूर्यफूल रिफाईंड तेल 1120-1220, वनस्पती तूप 960-1200, खोबरेल तेल 3000 रू.
साखर किंवटलचा भाव : साखर (एस) 3400-3450. तांदूळ : गुजरात उकडा नवीन 3000-3200, मसुरी 3000-3200, सोनामसुरी 3600-3800, कोलम 4000-4200, लचकारी कोलम 5000-5200, चिन्नोर 3800-4000, 1121, 9000-10000, आंबेमोहोर (सुवासिक) 5500-6000, बासमती अखंड 10000-10500, बासमती दुबार 7500-8000, बासमती तिबार 8500-9000, बासमती मोगरा 4500-5000, बासमती कणी 2800-3200, 1509- 5000-5500 रु. गहू :- सौराष्ट्र लोकवन 2500-3600, मध्य प्रदेश लोकवन भारी 2400-3350, लोकवन मध्यम 2150-2950, सिहोर 3200-4300, सिहोरी 2500-3400, मिलबर 2000-2600 रु. ज्वारी : गावरान भारी 3400-4000, गावरान मध्यम 2600-3500, दुरी 2200-2700 रु. बाजरी : महिको 1950-2400, गावरान 1700-2050, हायब्रीड 1600-1900 रू.
गूळ : गूळ एक्‍स्ट्रा 3150-3550, गूळ नं.1- 3050-3200, गूळ नं.2- 2850-3100, गूळ नं.3- 2750-2900, बॉक्‍स पॅकिंग 3000-3600, कडधान्ये : हरभरा 4500-4900, हुलगा 4100-4700, चवळी 5100-8900, मसूर 4600-5300. मूग गावरान 5700-6300, मूग पॉलिश 5500-6500, मटकी गावरान 5500-6600, मटकी गुजरात 5300-5900, मटकी सेलम 6600-7300, वाटाणा हिरवा 4300-5500, वाटाणा पांढरा 3100-3700, काबुली चणा 7000- 9300 रु. गोटा खोबरे : (10 किलोस) 1500-1550,
मिरची : ढब्बी 18000-19000, ब्याडगी 16000-18000, गुंटूर तेजा 11000-11500, खुडवा ब्याडगी 3000-3500, खुडवा गुंटूर 4000-5000,नारळ : (शेकड्याचा भाव) : नवा नारळ पॅकिंग 1600-1950, मद्रास 3200-3400, पालकोल जुना 1950-2200, सापसोल 2900-3150. पोहे ः पातळ पोहे 4500 – 4700, मीडियम पोहे 3800- 4200, दगडी पोहा 3600 -3900, सुपर पोहा 4300 – 4500, मध्यप्रदेश पोहा 4000 – 4200, पेन पोहा : 3900, भाजका पोहा : 500-525, भाजकी डाळ : 2500-2800, भंडग : 600-650, घोटी : 390, राजनांदगाव : 380, सुरती : 400, डाळी ः तूरडाळ 5300 – 6600, हरभरा डाळ 4300-5600, मूगडाळ 6100 – 7500, उडीद डाळ 4000 – 5800, मसूर 4100-4900, हिरवा वाटाणा 6100 -7500, शेंगदाणे ः घुंगरू 6200 -6900, स्पॅनिश 6800 – 8200, गुजरात जाडा 5600 – 6600, साबुदाणा : साबुदाणा नं. 1 : 5400-5700, साबुदाणा नं. 2: 5000-5200, साबुदाणा नं. 3: 4500-4800, भगर : 5900-6100, हळद (1 किंवटल) : क्रमांक1 : 950-1000, क्रमांक 2 : 850-900, क्रमांक 3 : 700-750, रवा (50 किलो) 1200 – 1550, आटा (50 किलो) 1150 – 1500, मैदा (50 किलो) 1050 – 1600. बेसन (50 किलो) : 2900-3100.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

Remarks :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)