तेलंगण कॉग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या घरावर प्राप्तीकर विभागाचा छापा

हैदराबाद – प्राप्तीकर विभागाने तेलंगण कॉंग्रेस अध्यक्ष ए. रेवणथ रेड्डी यांच्या घरावर छापा घातला. हैदराबाद आणि विकाराबाद जिल्ह्यातील कोडानगल येथील रेड्डी यांच्या निवासस्थानांची तपासणी करण्यात करण्यात आली. याशिवाय 2015 साली विधान परिषदेच्या निवडणूकीच्यावेळी तेलगू देसमच्या उमेदवाराच्या बाजूने मतदानासाठी आमदारांना लाच देण्याच्या प्रकरणामध्ये रेड्डी यांच्यासमवेत आरोपी असलेल्या सेबास्टियन हॅरी यांच्याही घरावरही प्राप्तीकर विभागाने छापे घातले.

रेवणथ रेड्डी यांच्या नातेवाईकांच्या मालकीच्या इन्फ्रास्ट्रक्‍चर कंपनीला डोळ्यासमोर ठेवून हे छापे घातले गेले असे प्राप्तीकर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. रेड्डी यांच्या नातेवाईकांशी संबंधित सुमारे डझनभर ठिकाणी हे छापे घातले गेले, असे या कारवाईशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. कॉंग्रेस पक्षाने या छाप्यांवर टीका केली आहे. हे छापे तेलंगणातील सत्तारुढ तेलंगण राष्ट्र समितीकडून तसेच केंद्रातील भाजप सरकारकडून राजकीय सूडापोटी घातले गेले असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. या घडामोडींच्या पार्श्‍वभुमीवर कॉंग्रेस नेत्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रेवणथ रेड्डी तेलगू देसम पार्टीमध्ये असताना 31 मे 2015 रोजी ऍन्टी करप्शन ब्युरोने त्यांना आमदार लाचखोरी प्रकरणी अटक केली होती. मात्र नंतर रेड्डी यांची जामिनावर मुक्‍तता झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)