तेलंगणात क्रिडापटुंसाठी राखीव जागा

हैदराबाद – तेलंगणा राज्यातील राज्यसरकारच्या सेवेत क्रीडापटूंसाठी दोन टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी घेतला आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतातर्फे भाग घेणाऱ्या 18 खेळाडुंच्या पथकाने आज सकाळी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.

सध्या शिक्षण संस्थांमध्ये क्रिडापटुंसाठी दोन टक्के राखीव जागा उपलब्ध आहेत पण सरकारी नोकरीत त्यांना ही सवलत मिळत नव्हती. तीही सुविधा आता राज्य सरकारने उपलब्ध करून दिली आहे. आज मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या खेळाडुंमध्ये बॅडमिंटन कोच पी गोपीचंद, सायना नेहवाल, पी व्ही सिंधु, श्रीकांत किदांबी, एस रणकीरेड्डी, एन सिक्की रेड्डी अदिंचा समावेश होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)