तेजल सोनवणे सीएम चषकाची मानकरी

चिंबळी-राज्य सरकारच्या वतीने कोंढवा येथे 30 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या सीएम चषक स्वच्छ भारत कुस्ती स्पर्धेत 66 ते 74 वजन गटात खेड तालुक्‍यातील कुरूळी येथील तेजल सोनवणे हिने प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले.
खेड तालुक्‍याचे व कुरूळी गावचे नाव लौकिक केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चषक व पन्नास हजार रुपयांचा धनादेश देण्यात तेजलला देण्यात आला. तेजल सोनवणे हिचे कुरूळी ग्रामस्थांच्या व खेड तालुक्‍याच्या वतीने माजी आमदार दिलीप मोहिते, खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास कातोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम सोनवणे, सुरेखा मोहिते, माजी आदर्श सरपंच चंद्रकांत सोनवणे, विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष सोपान सोनवणे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष गुलाब सोनवणे, एम. के. सोनवणे, सरपंच बाळासाहेब सोनवणे, माजी उपसरपंच अमित मुऱ्हे, उपसरपंच सुभद्रा सोनवणे, शाळा समितीचे चंद्रकांत सोनवणे आदि मान्यवरांच्या वतीने अभिनंदन व कौतुक केले केले जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)