तृतीयपंथीयानी साकारला पर्यावरणपूरक गणपती बाप्पा…

सातारा – पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. येथील संगमनगर भागातील जाणीव सामाजिक तृतीयपंथी विकास संस्थेने याचा अवलंब केला आहे.

प्रशांत वारकर या संस्थेच्या संघटकाने एक महिना परिश्रम घेवून स्वत: शाडूची गणपती बाप्पाची आकर्षक मूर्ती साकारली आहे. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचे मूर्ती बनविण्याचे ज्ञान नसताना फक्त इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी हे केले. याच गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करणार असल्याचे संस्थेच्या संस्थापिका सुनिता भोसले यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गणपती व देवीचा उत्सव मोठ्या आनंदात संस्थेच्यावतीने साजरा केला जातो. यामध्ये संस्थेचे सदस्य सहभागी होत असतात. प्रशांत वारकर व वैभव भोसले यांचे संस्थेला मोलाचे सहकार्य लाभते. सातारा शहरात तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या जाणीव संस्थेला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. मैत्री दिनानिमित्त संस्थेचा मोठा कार्यक्रम साजरा होतो. जाणीव सामाजिक तृतीयपंथी विकास संस्थेमध्ये असलेल्या तृतीयपंथीयामध्ये बीएससी बी. एड, डी. एड, इेलेक्‍ट्रिक इंजिनिअर, सिव्हील इंजिनअर पदवीप्राप्त सदस्य आहेत. मात्र तृतीयपंथी असल्याने त्यांना समाजामध्ये स्विकारले जात नसल्याची खंत वाटते असेही राहुल भोसले म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)