‘तुमच्या प्रश्‍नावर मी खुश होऊ की दु:खी’


पुणे – भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील विविध मतदार संघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. प्रत्येक मतदार संखातून एक कार्यकर्ता त्यांना प्रश्‍न विचारत होता आणि मोदी आपल्या शैलीतून त्याच्या प्रश्‍नाचे उत्तर देत होते. मात्र यावेळी पुण्याच्या नगरसेविका राणी भोसले यांनी मोदींना असा प्रश्‍न विचारला की स्वत: मोदी म्हणाले, “तुमच्या प्रश्‍नावर मी खुश होऊ की दुखी हेच कळेना”.

नगरसेविका राणी भोसले यांनी मोदींना विचारले, “की तुम्ही इतक्‍या योजना जाहीर केल्यात, इतकी कामे केलीत की आम्हीच विसरलो, त्या लक्षात ठेवण्यासाठी काय केले पाहिजे?”

यावर हसतच मोदी म्हणाले, “तुमच्या या प्रश्‍नासाठी मी खूश होऊ की दुखी हेच मला कळेना. खुश यासाठी की आपल्या सरकारने खरोखरच खूप कामे केली आहेत याची हे तुम्ही सांगितले. मात्र दुखी याविषयी की जर तुम्हीच पक्षाने केलेली कामे विसरलात तर लोकांपर्यंत आपली कामे कोण पोहचविणार?”

मात्र यावर तोडगा सांगताना मोदी म्हणाले, “आपण केलेल्या कामांचा एक आराखडा तयार करा आणि त्या कामांना कविता, गाणी, जोक, डायलॉग्स यांसारख्या “क्रीएटीव्ह’ मार्गाने लोकांपर्यंत पोहचवा. त्यामुळे नक्कीच त्या अधिक चांगल्याप्रकारे लोकांना समजतील.”

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)