तुटलेले दुवे जोडण्याचे काम केल्यास एकत्र येणे सोपे

भोर- समस्यांकडे संधी म्हणून पाहायला शिकल्यास समस्या सुटतात, क्षमतांची बेरीज केल्यास यशाचे शिखर गाठणे आवघड नसते यासाठी तुटलेले दुवे जोडण्याचे काम राजेशिर्के प्रतिष्ठानने करून समाजाची आर्थिक प्रगती साध्य करावी, असे आवाहन कृषितज्ज्ञ आणि शेतकरी बांधवांचे मार्गदर्शक प्रमोद राजेभोसले यांनी गवडी (ता. भोर) येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना प्रतिपादन केले. राजेशिर्के प्रतिष्ठान पुणे यांनी तालुक्‍यातील विद्यार्थ्यांना मोफत वह्या-पुस्तके वाटप आणि स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसिंह राजेशिर्के हे होते.तर प्रमुख उपस्थितांमध्ये सातारा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष व निवृत्त पोलीस निरीक्षक अनंत राजेशिर्के, सचिव प्रदीप राजेशिर्के, संतोष राजेशिर्के, वीरसिंह खानविलकर, दिगंबर गुजर, दत्तात्रय अहिरराव, सतीश खानविलकर, किशोर राजेशिर्के, संग्राम राजेशिर्के, शिवाजीराव राजेशिर्के, इंद्रजीत राजेशिर्के आदी मान्यवरांसह राजेशिर्के परिवारातील महिला, विद्यार्थी उपस्थित होते.
आपल्या भाषणात पुढे बोलताना प्रमोद राजेभोसले पुढे म्हणाले की, भोर तालुक्‍यात पर्यटन विकासाला मोठा वाव आहे.येथे कृषी पर्यटनाचा व्यवसाय सुरू करता येईल. आज पोल्ट्री व्यवसायाला चांगले दिवस आले असून पुणे त्यासाठी जवळची बाजारपेठ आहे. याकडे एक संधी म्हणून पाहता येईल. आज देशी गायींची संख्या प्रचंड कमी असल्याचे निदर्शनास आणुन देऊन दुग्ध व्यवसाय, समुह शेती, यावर सखोल माहिती देऊन तुटलेले दुवे जोडण्याचे काम राजेशिर्के प्रतिष्ठानने करावे, एका विशिष्ट चौकटीबाहेर जाऊन हे काम हाती घ्यावे असे आवाहन प्रमोद राजेभोसले यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांना इंग्लिश ग्रामरची पुस्तके आणि वह्यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप राजेशिर्के यांनी केले, सूत्र संचालन माधुरी राजेशिर्के यांनी केले, तर आभार किशोर राजेशिर्के यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)